esakal | म्हारी छोरियॉं छोरों से कम हैं के..!
sakal

बोलून बातमी शोधा

Nikita Nagne

म्हारी छोरियॉं छोरों से कम हैं के..!

sakal_logo
By
धीरज साळुंखे

"म्हारी छोरियॉं क्‍या छोरों से कम है के!' या "दंगल' चित्रपटातील डायलॉगचा खरा अर्थ उपरी येथील निकिता नागणेच्या कामाकडे पाहिला की समजतो.

भाळवणी (सोलापूर) : "म्हारी छोरियॉं क्‍या छोरों से कम है के!' या "दंगल' (Dangal) चित्रपटातील डायलॉगचा खरा अर्थ उपरी येथील निकिता नागणेच्या (Nikita Nagne) कामाकडे पाहिला की समजतो. आपल्या वडिलाच्या दहा गुंठे डाळिंबातील (Pomegranate) तेल्या रोगावर नियंत्रण करीत भरघोस उत्पन्न मिळावे म्हणून वीस लिटरचा पंप पाठीवर घेऊन डाळिंबाची फवारणी करत निकिताने युवा पिढीसाठी आदर्श निमार्ण केला आहे. (Nikita Nagne pays attention to education as well as work in her father's field)

हेही वाचा: दहावी-बारावी निकालाची ठरली तारीख !

सतत पावसाची हुलकावणी, शेतातून येणारे जेमतेम पीक आणि वाढता खर्च यामुळे घरची परिस्थिती हलाखीची. अशा परिस्थितीत कोलमडून न पडता नव्या उमेदीने निकिता नागणे आपल्या वडिलांना शेतात मदत करत आहे. ती पुणे येथील बृहन्महाराष्ट्र कॉलेज येथे बीकॉम उत्तीर्ण झाली आहे. सोबतच यूपीएससीचा ऍकॅडमीतून अभ्यास करीत आहे. गेली दोन महिने ती उपरी (ता. पंढरपूर) येथे घरी आली आहे. विठ्ठल नागणे व शोभा नागणे यांना तीन मुली असल्याने त्यांनी मुलींना मुलासारखे धाडसी संस्कार दिले आहेत. विठ्ठल नागणे हे "म्हारी छोरियॉं क्‍या छोरों से कम हैं के! असेही म्हणतात.

हेही वाचा: "विधानसभेचे अधिवेशन होते तर मग जि.प.ची सर्वसाधारण सभाच ऑनलाईन का?'

एक मुलगी प्रियांका ही अहमदाबाद (गुजरात) येथील हार्डवेअर डॉमेन एट टेकसन मायक्रोसिस प्रा. लि. कंपनीत काम करीत आहे, तर दुसरी सर्वांत लहान मुलगी नेहा ही कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात बारावी कॉमर्समध्ये शिक्षण घेत आहे. अवघ्या अर्ध्या एकर शेतीमध्ये त्यांनी दहा गुंठे डाळिंब व दहा गुंठे ऊस लावला आहे. वडिलांना मणक्‍याचा त्रास असल्यामुळे सर्व जबाबदारी निकिता आणि तिची बहीण नेहावर पडते. सध्या सर्वत्र तेल्या रोगाने डाळिंबावर थैमान घातल्याने शेतकरी हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत तेल्या रोगावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. काहीही झालं तरी डाळिंब पीक घेण्यासाठी निकिता वेळोवेळी एकही फवारणी चुकू न देता फवारणी करत असते.

सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sapkaal) यांना आदर्श मानणारी निकिता कष्टाबरोबरच अभ्यासावरही तेवढंच लक्ष देते. पहिल्यापासून काळी मातीशी नातं असल्याने ती फवारणी असू द्या किंवा ऊस शेतातील काम असू द्या, मोठ्या शिताफीने करत असते. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने मजुरांना पगार करणे शक्‍य नाही. त्यामुळे शेतातील कामे ती स्वतः करत असते. खासगी सावकारांकडून शैक्षणिक खर्चासाठी पैसे घेतले होते. त्यात त्यांना पाच गुंठे जमीन विकावी लागली असल्याची खंत आहे.

निकिताला व्हायचंय आयएएस अधिकारी

तासन्‌तास सोशल मीडियामध्ये गुंतलेली युवा पिढी व मोबाईलच्या खेळात दंग झालेल्या मुलांपुढे निकिताने एक आदर्श ठेवला आहे. निकिताला आयएएस अधिकारी बनायचे आहे. यासाठी तिची खूप कष्ट घेण्याची तयारी आहे.

मी नेहमीच पॉझिटिव्ह विचार करत आली आहे. माझ्या आई-वडिलांनी व मामांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले. घरची परिस्थिती हलाखीची असली तरी मी त्यावर मात करत माझा अभ्यासही चालू ठेवला आहे. अभ्यासात सातत्य ठेवत वेळप्रसंगी गावाकडेही वडिलांना शेतात मदत करत असते. संकटावर मात करायची असेल तर कष्ट करा.

- निकिता नागणे

loading image