esakal | अकरावी प्रवेशासाठी 'सीईटी' देताय? जाणून घ्या कशी असेल परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावी प्रवेशासाठी 'सीईटी' देताय? जाणून घ्या कशी असेल परीक्षा

अकरावी प्रवेशासाठी 'सीईटी' देताय? जाणून घ्या कशी असेल परीक्षा

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सीईटी दिलेल्यांचाच प्रवेशासाठी प्राधान्याने विचार होणार आहे.

सोलापूर : अकरावी प्रवेशासाठी सीईटी (CET Exam) ऐच्छिक करण्यात आली आहे. परंतु, सीईटी दिलेल्यांचाच प्रवेशासाठी प्राधान्याने विचार होणार आहे. ही परीक्षा 21 ऑगस्टला (शनिवारी) होणार आहे. http://cet.mh-ssc.ac.in यावर विद्यार्थ्यांना 26 जुलैपर्यंत सीईटीसाठी अर्ज करता येणार आहे. (Only those who have appeared for the CET exam will be given priority for admission in Class XI-ssd)

हेही वाचा: सोलापूरच्या 'पद्म'कन्येला विदेशात एक कोटीच्या नोकरीची ऑफर !

दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील अंदाजित 16 लाख विद्यार्थी होते. राज्याचा निकाल 99 टक्‍क्‍यांहून अधिक लागला असून त्यामध्ये 55 टक्‍क्‍यांहून अधिक मुलांना 75 टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक गुण मिळाले आहेत. यंदा विज्ञान (Science) व वाणिज्य (Commerce) शाखेला मुलांची मोठी गर्दी असणार आहे. दुसरीकडे, व्यावसायिक शिक्षणाकडेही (Vocational education) मुलांचा ओढा आहे. अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा ऑफलाइन होणार असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर एक तास अगोदर उपस्थित राहावे लागणार आहे. राज्यातील निर्बंधांमुळे शनिवार व रविवारी संपूर्ण व्यवहार बंद असतात. त्यामुळे त्या दिवशी तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रांवर जायचे कसे, असा प्रश्‍न सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) संयुक्‍त पूर्व परीक्षा होऊ शकलेली नाही. तरीही, पुणे बोर्डाने (Pune Board) सीईटी परीक्षा ऑफलाइन घेण्याचा हट्ट का धरला, याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही.

हेही वाचा: दोन वर्षांनंतर शिक्षक पात्रता परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!

जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात जागा आहेत, तरीही अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना "सीईटी' द्यावीच लागेल. सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने त्यांनी निवडलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळतील. त्यानंतर रिक्‍त राहिलेल्या जागांवर उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

- भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

परीक्षेसंदर्भातील ठळक बाबी...

  • ऑफलाइन "सीईटी'साठी 26 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत

  • इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, उर्दू, सिंधी, तेलुगु, हिंदी या माध्यमातून देता येईल परीक्षा

  • इंग्रजी माध्यमातून परीक्षा देणाऱ्यांना इंग्रजी, विज्ञान व तंत्रज्ञान, गणित या विषयांचे प्रश्‍न इंग्रजीतून सोडविता येतील

  • सामाजिक शास्त्र विषयाचे प्रश्‍न सोडविताना विद्यार्थ्यांना सातपैकी एक माध्यम निवडावे लागणार

  • 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी एक वाजेपर्यंत होईल सीईटी; अर्जात तालुका नमूद करणे आवश्‍यक

  • परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर उपस्थित राहावे लागणार; तालुक्‍याच्या ठिकाणी परीक्षा केंद्रे

  • दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक घेण्याची सुविधा; दिव्यांग विद्यार्थ्यांची होणार स्वतंत्र सोय, वाढीव वेळही मिळणार

  • राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित 100 गुणांची असेल प्रश्‍नपत्रिका; परीक्षेनंतर मिळणार कार्बन कॉपी

loading image