esakal | दोन वर्षांनंतर शिक्षक पात्रता परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर !
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वर्षांनंतर शिक्षक पात्रता परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!

दोन वर्षांनंतर शिक्षक पात्रता परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) (Teacher Eligibility Test) दोन वर्षांच्या कालावधीनंतर घेण्यात येणार आहे.

सोलापूर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) (Teacher Eligibility Test : TET) दोन वर्षांच्या कालावधीनंतर घेण्यात येणार असून, दहा लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेला बसतील, अशी शक्‍यता आहे. या परीक्षेसाठी ऍडमिट कार्डही देण्यात येणार असून, त्यासंबंधीचा तपशील नंतर उपलब्ध करून दिला जाईल. महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता चाचणीचे (MAHATET) (Maharashtra State Teacher Eligibility Test) तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे. वर्ग पहिली ते आठवीच्या शिक्षकांच्या निवडीसाठी ही परीक्षा घेतली जाते. (Announcing the probable schedule of Teacher Eligibility Test after two years-ssd73)

हेही वाचा: चिमुकल्यांची ऑगस्टमध्ये ऑफलाइन शाळा? आपत्ती व्यवस्थापनला प्रस्ताव

ट्विटरच्या माध्यमातून शिक्षणमंत्री म्हणाल्या, अध्यापनात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना ही संधी आहे. आम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) घेण्यास परवानगी दिली आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर घेण्यात येत असलेल्या या परीक्षेला दहा लाखाहून अधिक उमेदवार हजर राहण्याची शक्‍यता आहे.

गेल्या दोन वर्षात वेगवेगळ्या कारणांमुळे MAHATET आयोजित करण्यात आला नव्हता. ही परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येते. पहिला टप्पा इयत्ता पहिली ते पाचवीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आणि दुसरा टप्पा सहावी ते आठवीच्या वर्गासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी असेल. या परीक्षेसाठी ऍडमिट कार्डही देण्यात येणार असून, त्यासंबंधीचा तपशील नंतर उपलब्ध करून दिला जाईल. सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान MAHATET 2021 च्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अर्ज भरणे, प्रवेशपत्र, लेखी परीक्षा आणि अंतिम निकाल यांचा समावेश असेल. परीक्षेविषयी अधिक माहिती नंतर उपलब्ध करून देण्यात येईल.

हेही वाचा: पाच तालुक्‍यांतील विद्यार्थी अद्याप पुस्तकांविना !

दहावीचा निकाल नुकताच राज्यात जाहीर करण्यात आला असून, त्यात 99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनुसार ही उत्तीर्णाची विक्रमी टक्केवारी आहे. 2020 च्या तुलनेत यंदा निकाल 4.65 टक्‍क्‍यांनी जास्त लागला आहे. 2020-21 मध्ये महाराष्ट्रातील एकूण 15.74 लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु, कोविडच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने एप्रिल महिन्यात घेण्यात येणारी ऑफलाइन परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यांकनानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यास मंडळाला भाग पडले. निकालाच्या मूल्यांकन निकषात इयत्ता नववीमधील गुण आणि दहावीमधील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन यांचा समावेश होता.

loading image