Uddhav Thackeray
sakal
कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक प्रभाव असलेली शिवसेना आज अस्तित्व, नेतृत्व आणि विस्ताराच्या तिहेरी आव्हानांना सामोरी जात आहे. पक्षफूट, निवडणूक आयोगाचा निर्णय, संघटनात्मक घसरण आणि बदलते राजकीय समीकरण यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नव्या वळणावर उभा आहे. एकीकडे पक्षाचे जहाज सांभाळण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे मतदारांचा विश्वास पुन्हा मिळविणे आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. सध्या सुरू असलेल्या ‘राजकीय ऑपरेशन’मुळे सामान्यांची मती गुंग झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाची सध्याची अवस्था, त्यामागील कारणे आणि पुढील वाटचालीविषयी.