

Operation Tiger 4
esakal
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षफुटीच्या चर्चांना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी येत्या काही दिवसांत राज्यात ‘ऑपरेशन टायगर-४’ होणार असल्याचा मोठा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल १४ आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट पडणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.