Consul General of Brazil jose mauro
sakal
भारत-ब्राझील यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २०३० पर्यंत २० अब्ज डॉलरपर्यंत करायचा आहे. औषध व लसनिर्मिती, खतनिर्मिती, स्वच्छ इंधन क्षेत्रात संशोधन आणि विकास, पाटबंधारे क्षेत्रातील पायाभूत सुविधा, जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया, पशुवैद्यक या क्षेत्रात भारत व महाराष्ट्रातील उद्योजकांना ब्राझीलमध्ये संधी आहे, असे ब्राझीलचे मुंबईतील महावाणिज्यदूत जोसे माऊरो यांनी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘एपी ग्लोबाले’ यांच्यातर्फे आयोजित ‘अ प्रिमिअर इंडो ब्राझील बिझनेस डायलॉग’मध्ये सांगितले.