

MVA Targets Government Says State Run by Criminals and Scamsters
Esakal
नागपुरात सोमवारपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन होणार आहे. विधानभानातील बैठकीनंतर मविआ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला असून पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, नतद्रष्ट लोकांच्या चहापानाला जाणार नाही.