esakal | दिल्लीवारीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

दिल्लीवारीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : सध्या महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांच्या दिल्ली वारीमुळे राज्यातील राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी नुकतीच दिल्लीवारी (fadnavis delhi visit) केली. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबत युती करण्याचे सुतोवाच केले. तसेच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यामुळे फडणवीसांची दिल्लीवारी राजकीय तर नव्हती ना? अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यावरच आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे. (opposition leader devendra fadnavis statement on delhi visit)

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलला पर्याय : गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ

जे नवीन मंत्री झालेत, त्यांची शुक्रवारी दिल्लीला भेट घेतली. तसेच आणखी काही कामं होती, त्यासाठी दिल्लीला गेलो होतो. केंद्र सरकारकडे आपली विविध कामे असतात, त्यासाठी जावं लागतं. या दिल्ली भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ लावण्याचं काही कारण नाही, असे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचा मुद्दा सोडला, तर मनसेसोबत आमची युती होऊ शकते, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचं हे विधान महत्त्वाचं मानले जात आहे. नेहमीच असं पाहण्यात येतं की, चंद्रकांत दादांचं म्हणणं पूर्णपणे समजून घेतलं जात नाही. बरेचदा अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या पसरवल्या जातात. त्यामुळे सर्वत्र संभ्रम निर्माण होतो. चंद्रकांत पाटलांनी शुक्रवारी केलेले विधान, ते त्यांनी अभ्यासपूर्णच केले असेल. माझे याबाबत त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. त्यांच्याशी बोलून झाल्यावर यावर प्रतिक्रिया देईन. तसेही महानगरपालिका निवडणुकीला अजून वेळ आहे. त्यासाठी आत्ताच घाई करण्याची गरज नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

loading image