esakal | बुधवारपर्यंत कोकणात अतिवृष्टी; महामुंबईतही पावसाचा जोर वाढणार...
sakal

बोलून बातमी शोधा

बुधवारपर्यंत कोकणात अतिवृष्टी; महामुंबईतही पावसाचा जोर वाढणार...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारपर्यंत सलग मोठ्या पावसाची शक्‍यता आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सोमवारपासून बुधवारपर्यंत मुसळधार ते अतिमुळधार शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात 200 मिमी पर्यंत पाऊस होण्याची शक्‍यता आहे.

बुधवारपर्यंत कोकणात अतिवृष्टी; महामुंबईतही पावसाचा जोर वाढणार...

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : महामुंबईसह संपूर्ण कोकणात पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्‍यता आहे. सोमवारपासून महामुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे. काही भागात तब्बल 200 मिमीपर्यंत पाऊस होण्याची शक्‍यता असून सर्व यंत्रणांना सज्जतेचा इशारा देतानाच ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

सदनिकेतील गळतीसाठी चक्क महापालिकेने बजावली नोटीस; याप्रकारची पहिलीच घटना...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारपर्यंत सलग मोठ्या पावसाची शक्‍यता आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सोमवारपासून बुधवारपर्यंत मुसळधार ते अतिमुळधार शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात 200 मिमी पर्यंत पाऊस होण्याची शक्‍यता आहे. अतिवृष्टीची शक्‍यता लक्षात घेऊन वेधशाळेने सर्व यंत्रणांना सज्ज राहाण्याची सूचना केली आहे. त्यानुसार नाविकदल, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्नी निवारण दलास तैनात ठेवण्यात आले आहेत.

तब्बल चार महिने त्यांनी प्रतिक्षा केली; अखेर फोन आला आणि ते गावी परतले...

"मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता आहे. सोमवारपासून पावसाची जोर वाढणार असून घाट भागात अतिमुसळधार पावसाची शक्‍यता आहे, असे मुंबई वेधशाळेचे उपमहाव्यवस्थापक के.एस.होसळीकर यांनी सांगितले.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो आणखी लांबणीवर; प्रकल्पाचे केवळ चार टक्केच काम पूर्ण..

रविवार उकाड्याचा
मुंबईत आज कुलाबा येथे 23 मि.मी पाऊस नोंदविण्यात आलेला आहे. तर सांताक्रुझ येथे पावसाची नोंद झाली नाही. कुलाबा येथे आज कमाल 30.8 आणि किमान 26 अंश सेल्सिअस तापामानी नोंद झाली आहे. सांताक्रुझ येथे 32.9 अंश कमाल आणि 25.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील 24 तास तापमान याच पातळीवर राहाण्याचा अंदाज आहे. उपनगरात आज दुपारी उन्हाच्या झळा जाणवत होत्या. रविवारीही नागरीकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. 
----                
संपादन : ऋषिराज तायडे