esakal | सदनिकेतील गळतीसाठी चक्क महापालिकेने बजावली नोटीस; याप्रकारची पहिलीच घटना...
sakal

बोलून बातमी शोधा

सदनिकेतील गळतीसाठी चक्क महापालिकेने बजावली नोटीस; याप्रकारची पहिलीच घटना...

गृहनिर्माण सोसायटीच्या कायद्यानुसार सोसायटीतील समितीस ही गळती थांबवण्याचा आधिकार असतो. ते दोघा फ्लॅट मालकांना सांगूनही ते करु शकतात, याकडे महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर संघटनेचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी लक्ष वेधले आहे.

सदनिकेतील गळतीसाठी चक्क महापालिकेने बजावली नोटीस; याप्रकारची पहिलीच घटना...

sakal_logo
By
संजय घारपुरे

मुंबई : अंधेरीत सातव्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेला महापालिकेने नोटीस बजावली आहे. मात्र, पालिकेने अशाप्रकारची नोटीस बजावण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी, अशी चर्चा परिसरात सुरु आहे. आता तुम्ही म्हणाल की अशी कोणती नोटीस पालिकेने बजावली आहे. तर मुद्दा असा आहे की, तुमच्या घरातून खालच्या घरात गळणारे पाणी पंधरा दिवसात थांबवा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस मुंबई महापालिकेने बजावल्याने सर्वांना धक्का बसला आहे. एखाद्या घरातील लिकेजबाबत महापालिकेने नोटीस देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावे असे काहींचे मत आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो आणखी लांबणीवर; प्रकल्पाचे केवळ चार टक्केच काम पूर्ण..

महापालिकेच्या के पूर्व प्रभागाच्या सहायक अभियंत्यांनी चक्रवर्ती अशोक हाऊसिंग सोसायटीमधील घरमालकास ही नोटीस बजावली आहे. आपल्या घरातील लिकेजबाबत तसेच इमारतीची तपासणी करण्याबाबत महापालिकेकडे तक्रार आली असल्याचे वृत्त आहे. तक्रार आल्यावर नोटीस देण्याचाच नव्हे तर त्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचा आधिकार महापालिकेस असल्याचे पालिकेचे आधिकारी सांगतात.  

5 हजार खाटांच्या महारुग्णालयाची तयारी सुरू; पालिकेने जमिनीसाठी मागितले अर्ज

मात्र, गृहनिर्माण सोसायटीच्या कायद्यानुसार सोसायटीतील समितीस ही गळती थांबवण्याचा आधिकार असतो. ते दोघा फ्लॅट मालकांना सांगूनही ते करु शकतात, याकडे महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर संघटनेचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी लक्ष वेधले आहे.  वरच्या मजल्यावरील घरातून गळती असल्याची तक्रार होणे काही नवीन नाही. अनेकदा सोसायटीत यावरुन वादही होतात. आता महापालिकेने केलेल्या कारवाईचे दूरगामी परिणाम होतील, असा अंदाज अखिल भारतीय सहकारी सोसायटी संघटनेच्या जेबी पटेल आणि विजय पटेल यांनी व्यक्त केला. दरम्यान, एखाद्या घरातून गळती झाल्यास त्याचा खर्च संबंधित दोन घरांनी समान करावा, याऐवजी हा खर्च त्या दोन घरांसह सोसायटीचाही त्यात सहभाग असावा, अशी सूचना प्रभू यांनी केली.
---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image
go to top