तुळजापूरचा रामानुजन! आठवी शिकलेला हमाल पण अचाट आकडेमोड भल्या भल्या गणिततज्ञांना कोड्यात टाकेल

अवघ्या आठवीपर्यंत शिकलेले अविनाश जमादार हे गणिताची काठिण्यपातळी आणि आकडे सहजपणे सांगतो
tuljapur mathematian
tuljapur mathematianesakal

तुळजापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली करणारे अविनाश सुधीर जमादार हे सध्याच्या काळातील गणितीतज्ज्ञ ठरले आहेत. अवघ्या आठवीपर्यंत शिकलेले अविनाश जमादार हे गणिताची काठिण्यपातळी आणि आकडे सहजपणे सांगतो.

tuljapur mathematian
Health Tips : लवकर म्हातारे व्हायचं नसेल तर भोपळा खा, डिप्रेशनपासूनही वाचवतो अन् ताजेपणा देतो

यासंदर्भात अविनाश जमादार म्हणतात, मी स्वतःच सर्व आकड्यांचा सराव केला आहे. सर्व तयारी मनातच करतो. मला कोणाचेही मार्गदर्शन मिळाले नाही. कोणतेही आकडे पाठ केल्यानंतर माझ्या लक्षात राहतात, हे माझे कौशल्य आहे. मी हमाली करून गाड्या भरतो. कोणत्याही आकड्यांच्या पुढे १९ शून्य लावल्यास एक महाशंख होतो. खर्व, निखर्व, पद्म अशा आकड्यांची माहिती ते सहजपणे सांगतात.

tuljapur mathematian
Uric Acid Control Tips : युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी ‘या’ भाज्यांचा करा आहारात समावेश

एक हजारांपासून दहा महापद्मपर्यत सर्व आकडे सांगण्याची कला त्यांच्याकडे आहे. ते दहा वर्षांपासून तुळजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करत आहेत. अविनाश यांचे शिक्षण येथील तुळजाभवानी शाळेत (भटकी शाळेत) झाले आहे.अविनाश जमादार याचे वडील मेडिकल तसेच बांधकाम क्षेत्रात काम करतात. मी स्वतः गुणाकार, वेगवेगळ्या आकड्यांचा गुणाकार मनातच करतो. मला कोणाचेही मार्गदर्शन नाही. देवीचा भक्त आहे. तसेच चित्रपटातील गाण्यावर नृत्य करतो.

- अविनाश जमादार, हमाल आणि गणिततज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com