Shivsena: ठाकरे गटाची शपथपत्रे खोटी; आक्षेपानंतर प्रकरणाचा तपास सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena: ठाकरे गटाची शपथपत्रे खोटी; आक्षेपानंतर प्रकरणाचा तपास सुरू

Shivsena: ठाकरे गटाची शपथपत्रे खोटी; आक्षेपानंतर प्रकरणाचा तपास सुरू

उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याची अनेक शपथपत्र मुंबईत एकाच ठिकाणी आढळून आली होती. त्यानंतर शिंदे गटाकडून ही सर्व शपथपत्रे बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे (क्राईम ब्रांच) वर्ग करण्यात आले होते. त्याचा तपास आता सुरू झाला आहे.

ही सर्व कागदपत्रे बोगस असल्याचा आरोप शिंदेगटाने केल्यावर याप्रकरणी तपास पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सुरू केला आहे. मुंबई गुन्हे शाखेची एकूण चार पथक सध्या कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिकला रवाना झाली आहेत. पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयात या तपास पत्रकांचा तपास केला जाईल. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ दिलेली सुमारे 4500 हजार शपथपत्र बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

हेही वाचा: Shivsena: शिवसेनेचा बनावट शपथपत्र वाद चिघळला, तपास गुन्हे शाखेकडे

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर संपूर्ण शिवसेना फुटून वेगळी झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शपथपत्रांची मोहीम राबवली. आम्ही निष्ठावंत, आम्ही उद्धव ठाकरेंसोबत, असा आशय असणारी शपथपत्र शिवसैनिकांकडून गोळा केली जात होती. दरम्यान, त्यातील 4500 हजार शपथपत्रांबाबत शंका घेतली जात आहे.

हेही वाचा: ShivSena: वाद चिघळला! "उद्धव ठाकरेंसाठी बेड राखीव ठेवा"; शिंदे गटाचं मेंटल हॉस्पिटलला पत्र