ShivSena: वाद चिघळला! "उद्धव ठाकरेंसाठी बेड राखीव ठेवा"; शिंदे गटाचं मेंटल हॉस्पिटलला पत्र

दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून पुण्यातील शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
Uddha Thackeray_Eknath Shinde
Uddha Thackeray_Eknath Shinde

पुणे : उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या तिखट टिप्पणीवरुन पुण्यातील शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट येरवडा येथील मनोरुग्णालयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी जागा राखीव ठेवण्यात यावी, अशा मागणीचं पत्र रुग्णालयाला लिहिलं आहे. (Eknath Shinde group letter to Yerawada mental hospital demanded to reserve a bed for Uddhav Thackeray)

Uddha Thackeray_Eknath Shinde
'धनुष्यबाण' आम्हालाच मिळावं; CM शिंदेंचं निवडणूक आयोगाला साकडं!

उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्या सभेत एकनाथ शिंदे यांच्या नातवावर टिप्पणी केली. त्याचं हे विधान एकनाथ शिंदे यांच्यासह त्याचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. तसेच याचा निषेध करण्यासाठी त्यांनी येरवड्यातील मनोरुग्णालयात एक जागा आरक्षित करा अशा मागणीचं पत्र दिलं आहे.

Uddha Thackeray_Eknath Shinde
Petrol-Diesel: दिवाळीनंतर वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर? निवडणुकांचाही होणार नाही परिणाम

येरवडा भागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक अजय भोसले यांनी हे मागणीचं पत्र येरवडा मनोरुग्णालयातील व्यवस्थापकांना दिलं आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं की, असं वक्तव्य करताना उद्धव ठाकरेंनी त्या बाळाच्या घरच्यांचा कधी विचार केला आहे का? त्याचं हे विधान अत्यंत हीन पातळीवरचं, खेदजनक आणि धक्कादायक आहे.

Uddha Thackeray_Eknath Shinde
RBI लॉन्च करणार ई-रुपया; जनजागृतीसाठी कन्सेप्ट पेपर जाहीर

"सत्तेतून पायउतार झाल्यामुळं त्यांची मनस्थिती बिघडली असावी असं आम्हाला वाटतं. त्याचं मानसिक संतुलित रहावं आणि ते बिघडलं असेल तर त्यावर उपचार होणं गरजेचं आहे, असं आम्हाला वाटतं. आपल्या पुण्यातील रुग्णालयात अशा प्रकारच्या रुग्णांवर योग्य उपचार करता येतात, त्यामुळं आपल्या रुग्णालयात उद्धव ठाकरेंसाठी एक जागा (बेड) राखीव ठेवावा," असा मजकूर या पत्रात लिहिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com