बाबासाहेबांच्या प्रत्येक श्वासात होता शिवरायांचा ध्यास - राज्यपाल कोश्यारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari
बाबासाहेबांच्या प्रत्येक श्वासात होता शिवरायांचा ध्यास - राज्यपाल कोश्यारी

बाबासाहेबांच्या प्रत्येक श्वासात होता शिवरायांचा ध्यास - राज्यपाल कोश्यारी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज सकाळी निधन झालं असून, त्यांच्य निधनाने अवघा महाराष्ट्र शोककूल झाला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोककल्याणकारी छत्रपती शिवरायांचे चरित्र आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत जागविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाल्यांचं यावेळी राज्यपालांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा अल्पपरिचय

भगतसिंह शिवशाहीर यांनी यावेळी सांगितले की, बाबासाहेब पुरंदरे हे उत्तुंग प्रतिभेचे अलौकिक व्यक्तित्व होते. त्यांचे भावविश्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारावले होते. त्यांच्या प्रत्येक श्वासात महाराजांचा ध्यास होता. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या लिखाणातून, व्याख्यानांमधून तसेच 'जाणता राजा' सारख्या महानाट्यामधून त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे पुण्यकार्य केले.

हेही वाचा: 'असा माणूस शतकांमधून एकदाच होतो'; मृणाल कुलकर्णी भावूक

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील शिवसृष्टीला भेट दिली असताना राज्यपाल आणि बाबासाहेब पुरंदरे यांची भेट झाली होती. तसेच त्यानंतर एका पुरस्कार सोहळ्यासाठी बाबासाहेब पुरंदरे हे राजभवन आले होते. या आठवणींना भगतसिंह कोश्यारी यांनी उजाळा दिला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने भारतवर्षाच्या आसमंतातील एक तेजस्वी शिवतारा निखळला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच त्यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी साकारणे व शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वदूर पोहोचविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असंही ते पुढे म्हणाले आहेत.

loading image
go to top