‘पाक’च्या साखरेने भाजप ‘घायाळ’!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई - पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेवरून भारतीय जनता पक्ष पुरता घायाळ झाल्याचे चित्र आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून विरोधाची धार तीव्र होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट आंदोलन करत सरकारला लक्ष्य केले. 

‘दैनिक सकाळ’ने रविवारी (ता. १३) ‘सम्राटांच्या गडात पाकची साखर’ या मथळ्याखाली सर्वप्रथम ही बातमी प्रकाशित केली. त्यानंतर लगेचच राज्यभरात सोशल मीडियातून सरकारच्या या धोरणावर टोकदार टीका सुरू झाली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान, सकाळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाकिस्तानची साखर साठवणूक केलेल्या कल्याण परिसरातील गोदामावर थेट छापा टाकत साखरेची पोती फाडून टाकली. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवी मुंबई व पनवेलमधील पदाधिकाऱ्यांनी या साखरेची विक्री रोखली. 

केंद्र सरकारने देशातल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचा संताप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्‍त केला. 

पाकिस्तान सरकार म्हणते, ‘टोमॅटो कितीही महाग झाला तरी चालेल; पण पाकिस्तानमध्ये भारतासारख्या शत्रुराष्ट्रातून टोमॅटो आयात करणार नाही.’ मग मोदी सरकारने पाकिस्तानची साखर कशासाठी खरेदी केली? भारतीय शेतकरी जवळचा की पाकिस्तान याचे उत्तर मोदींनी द्यावे.
- खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते

Web Title: pakistan sugar BJP MNS Agitation