
भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पाकिस्तानविरुद्ध आपला राग व्यक्त करत आहेत. स्पष्ट मतांसाठी ओळखले जाणारे बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य यांनीही पाकिस्तानी लोकांवर आपला राग व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की पाकिस्तानी स्टार्स इथे शूटिंग करत आहेत. त्यांचा कॅमेरा तोडण्याची हिंमत कोणी केली का? यावर आता चर्चांना उधाण आले आहे.