MSRTC Earns ₹41.18 Crore from Ashadhi Wari Special Buses
esakal
आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा उत्सव असतो. त्यानिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरकडे निघतात. यंदाही या भक्तिमय प्रवासात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची 'लालपरी' वारकऱ्यांसाठी विश्वासाची साथीदार ठरली आहे. विशेष म्हणजे, आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने केलेल्या नियोजनामुळे तब्बल ९ लाखांहून अधिक भाविकांनी सुरक्षित आणि सुखकर प्रवास केला आहे.