पंढरपूर कॉरिडॉर ‘जी प्लस-वन’ संकल्पनेवर साकारला जाणार! एकाचवेळी 3 हेलिकॉप्टर उतरतील असे हेलिपॅड, जुन्या दगडी पुलाजवळ नवीन पूल; 3,993 कोटींचा प्रकल्प, वाचा...

पंढरपुरात साकारला जाणारा कॉरिडॉर ‘जी प्लस-वन’ संकल्पनेवर साकारला जाणार आहे. 'जी प्लस वन' म्हणजे तळमजला आणि त्यावर बांधलेला पहिला मजला अशी दोन मजली इमारत असणार आहे. तळमजल्यावर सध्याच्या व्यापाऱ्यांची दुकाने असणार आहेत.
पंढरपूर चंद्रभागा नदी

पंढरपूर चंद्रभागा नदी

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : पंढरपुरात साकारला जाणारा कॉरिडॉर ‘जी प्लस-वन’ संकल्पनेवर साकारला जाणार आहे. 'जी प्लस वन' म्हणजे तळमजला आणि त्यावर बांधलेला पहिला मजला अशी दोन मजली इमारत असणार आहे. तळमजल्यावर सध्याच्या व्यापाऱ्यांची दुकाने असणार आहेत. पहिल्या मजल्यावर देवस्थानचे कार्यालय, वारकरी महामंडळाचे कार्यालय, संतपीठ, पोलिस चौकी, आरोग्य केंद्र यासह अत्यावश्‍यक कार्यालय असा कॉरिडॉर साकारला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाने ४ हजार १२० कोटींचा कॉरिडॉर प्रस्ताव शिखर समितीपुढे सादर केला होता. जुन्या दगडी पुलाशेजारी नवीन पूल बांधण्याचे काम दोन वेळा दाखविण्यात आले होते. शिखर समितीने यातील एक काम कमी केल्याने आता कॉरिडॉरची किंमत ३ हजार ९९३ कोटी रुपये झाली आहे. यातील ३० टक्के रक्कम तातडीने देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. कॉरिडॉरसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, हे काम गुणवत्तेचे व वेळेत (३० महिन्यात) व्हावे, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचेही जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले. भूसंपादनासाठी २ हजार २६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. उर्वरित निधीतून बांधकामे होणार आहेत. पुढील ५० वर्षातील पंढरपूर व या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेऊन हा कॉरिडॉर साकारला जाणार आहे.

पंढरीतील २२ रस्त्यांचा होणार विकास

कॉरिडॉरमधून नदीघाटाचा विकास केला जाणार आहे. नदी घाटावर स्वच्छतागृह, स्नानगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि उज्जैनच्या धर्तीवर स्नानकुंड असणार आहे. प्रदिक्षणा मार्गही सुसज्ज केला जाणार आहे. हा मार्ग २.२ किलो मिटरचा आणि १५ मिटर रुंदीचा असणार आहे. आषाढी एकादशीच्या काळात अनेकजण पंढरपुरातील शाळेत मुक्काम करतात. कॉरिडॉरमध्ये शाळांसाठीही निधी देण्यात आला आहे. पंढरपूरात १५ स्वागत कमानी उभारल्या जाणार आहेत. पिराची कुरोली, भंडी शेगाव, वाखरी आणि पन्नास एकर अशा चार पालखी तळांचा विकास केला जाणार आहे. पंढरपुरातील २२ रस्त्यांचा विकास केला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले.

एक हेलिपॅड अन्‌ चार वाहनतळ

पंढरपुरात एकाचवेळी तीन हेलिकॉप्टर उतरविता येतील, असे भव्य हेलिपॅड सध्याच्या जागेवरच साकारले जाणार आहे. पंढरपुरातील चार वाहनतळांचा विकास केला जाणार आहे. या वाहनतळाशेजारी व्यापारी संकुल उभारून पंढरपूरच्या अर्थकारणाला नवीन संधी दिली जाणार आहे. जागोजागी सीसीटीव्ही, चार्जिंग स्टेशन, यात्री सुविधा केंद्र प्रस्तावित केल्याची माहितीही जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com