पंढरपूर दर्शनरांगेत चेंगराचेंगरीचा प्रकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पंढरपूर - दर महिन्याच्या एकादशीच्या दोन दिवस आधीपासून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात; परंतु श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समिती आणि पोलिस लक्ष देत नसल्याने प्रत्येक वेळी दर्शन रांगेत चेंगरचेंगरी सदृश स्थिती निर्माण होते. आज सायंकाळी पाचच्या सुमारासदेखील तोच प्रकार घडला. एखादी दुर्घटना घडल्यावरच संबंधितांकडून उपाययोजना केली जाणार आहे का? असा सवाल भाविकांमधून व्यक्त होत आहे.

दर महिन्याच्या एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. एकादशीच्या आधी दोन दिवसांपासून भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे दर्शनाची रांग दर्शनमंडपातून वीणे गल्लीतून चंद्रभागा घाटाच्या पुढे जाते. दर्शनाच्या उड्डाण पुलाचे काम अपूर्ण असल्याने उड्डाण पुलावर प्रवेश करण्याच्या ठिकाणी एकच गोंधळ उडतो. दर्शन रांगेत अबालवृद्ध, नागरिक, तसेच चिमुरडी मुलेदेखील असतात. अशा परिस्थितीत गर्दीमुळे चेंगराचेंगरी सदृश स्थिती निर्माण होते.

Web Title: Pandharpur Darshan Line Stampede