यंदा ६७५ लाख टन ऊसगाळप शक्‍य

भारत नागणे 
मंगळवार, 18 जुलै 2017

पंढरपूर - गतवर्षी राज्याच्या सर्वच भागांत समाधानकारक व पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा ऊस क्षेत्रात वाढ झाली आहे. सोलापूर, सांगली, नगर या भागांत ऊसउत्पादनात भरीव अशी वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात दुपटीने म्हणजे सुमारे ६७५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादन घटल्याने साखर कारखान्यांना नुकसान सहन करावे लागले. मागील वर्षी राज्यातील सुमारे दीडशे कारखान्यांनी ३७२ लाख टन उसाचे गाळप करून ४१.८६ लाख टन साखरउत्पादन केले होते, तर अनेक कारखाने ऊसाअभावी बंद राहिले होते. राज्यात एकूण १७८ सहकारी व खासगी साखर कारखाने आहेत. सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा जवळपास ६७५ लाख टन ऊसगाळपासाठी उपलब्ध होणार आहे. उपलब्ध उसापासून सुमारे ७२ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. सरासरी यंदा ३०३ टन लाख ऊस अधिक उपलब्ध होणार आहे, तर दुसरीकडे सुमारे ३० लाख टन जादा साखरेचे ही उत्पादनही मिळणार आहे. सर्वच साखर कारखान्यांनी हंगामाच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे.

यंदाच्या हंगामासाठी १७८ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ६७५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असून, त्यापासून ७२ लाख टन साखर अपेक्षित आहे. 
-संजीव बाबर, व्यवस्थापकीय संचालक, राज्य साखर संघ, मुंबई

Web Title: pandharpur news sugarcane