Pandharpur Vitthal Mandir : पंढरपुरच्या मंदिरात असं काय घडलं? अर्ध्या तासातच टनभर द्राक्षांची आरास गायब

pandharpur vitthal temple decoration with grapes vanished in half hour
pandharpur vitthal temple decoration with grapes vanished in half hour

पंढरपूर येथिल विठ्ठल मंदिरात एक टन द्राक्षांची आरास करण्यात आली होती, दरम्यान सजावटीच्या अगदी काही तासांतच ही द्राक्ष गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही द्राक्ष भाविकांनी नेल्याचे मंदीर समितीने केला आहे. मात्र ही द्राक्ष खरंच भाविकांनी नेली की आणखी कोणी याबद्दल चर्चा सुरू आहे.

आजच्या आमलकी एकादशी निमीत्त पुणे येथील भाविक सचिन चव्हाण आणि बारामतीचे बाळासाहेब शेंडी यांच्या वतीने विठ्ठल-रुक्मीणी मंदिरात ही द्राक्षांची आरास करण्यात आली होती. यासाठी तब्बल एक टन इतकी द्राक्ष वापरण्यात आली होती. सकाळी सहा वाजता ही आरास केली मात्र अवघ्या अर्ध्या तासात ही द्राक्ष मंदीरातून गायब झाली.

मंदीर समितीने ही द्राक्ष मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी नेल्याचे सांगण्यात आले. मात्र काही भाविकांनी कर्मचाऱ्यांनीच ही द्राक्ष नेल्याचा आरोप केला आहे. यामुळे नेमकं ही द्राक्ष कोणी नेली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

pandharpur vitthal temple decoration with grapes vanished in half hour
Sandeep Deshpande Attack : आदित्य ठाकरे-राऊतांना ताब्यात घ्या, अन्…; मनसे नेत्याची मागणी

अनेक सण-समारंभ तसेच एकादशीच्या निमीत्ताने मंदिरात अशा प्रकारची आरास करण्यात येते. अशी आरास दिवसभर ठेवली जाते जेणेकरून भाविकांना ती पाहाता येईल. ही द्राक्ष देखील नंतर भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार होती मात्री आरास केल्याच्या अर्ध्या तासांतच ही द्राक्ष गायब झाली. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.

pandharpur vitthal temple decoration with grapes vanished in half hour
Ajit Pawar News : "सर्वसामान्यांचे सरकार असल्यावर असंच होणार"; संदीप देशपांडेंवरच्या हल्ल्यावरून अजित पवारांचा टोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com