
Sandeep Deshpande Attack : आदित्य ठाकरे-राऊतांना ताब्यात घ्या, अन्…; मनसे नेत्याची मागणी
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉकला गेल्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने एकट खळबळ उडाली. या हल्ल्यात संदीप देशपांडे जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून देखील याबद्दल प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच संदीप देशपांडे याच्यावरील हल्ल्याप्रकरणी आता आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी व्हावी अशी मागणी मनसेने केली आहे.
सकाळी झालेल्या या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांन हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी मनसेच्या अनेक नेत्याने देशपांडे यांची भेट घेतली. मनसे नेत्यांकडून हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
यावेळी माध्यमाशी बोलताना मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी मुंबई पोलिसांना नम्र विनंती आहे, महाराष्ट्रातील चिंधीचोर गुंड आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी. संदीप देशपांडे हे मुंबई महानगरपालिकेतील यांचे यांचे भ्रष्टाचार सातत्याने बाहेर काढतायत त्यामुळे हा हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच खोपकर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिसांना विनंती आहे की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताब्यात घ्यावं. त्यांची चौकशी करावी. चौकशीत तथ्य आढळल्यास त्यांनी अटक करावी, तसेच मुंबई पोलिसांनी योग्य ती सुरक्षा संदीप देशपांडे यांना पुरवावी अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली.