पंकजांची नाराजी आणखी उघड; पक्षाच्या बैठकीकडेच पाठ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

पंकजा मुंडे 12 तारखेला गोपीनाथ गडावर काय घोषणा करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खऱच मुंडे या पक्ष सोडणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

औरंगाबाद : आज भाजपची मराठवाडा विभागीय संगठण आढावा बैठक सुरु आहे. या बैठकीत पक्ष विस्तार, पराभूत झालेल्या उमेदवारांबाबत चर्चा सुरु आहे. गेल्या तीन तासांपासून औरंगाबाद येथे ही बैठक सुरु आहे. मात्र या बैठकीकडे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवली आहे.

आणखी वाचा - 'हे तर मोदी-शहांचं व्होट बँक राजकारण'

दरम्यान, पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याची
चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मुंडे या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपुर्वी एक फेसबुक पोस्ट टाकत भावनिक आवाहन केले होते. तसेच त्यानंतर दोनच दिवसात त्यांनी व्टिटरवरिल आपल्या अकाउंटवरचे कमळ हटवून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो ठेवला होता. यावरून त्या 12 तारखेला पक्ष सोडणार अशी चर्चा राडकीय वर्तुळात रंगली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक ओबीसी नेते भाजपमध्ये आपल्याला भेदभावाची वागणूक दिली जात असल्याची सध्या तक्रार करत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा देखील समावेश आहे. नाराज खडसे आज पक्षनेतृत्वाची भेट घेण्यासाठी दिल्ली येथे गेले आहेत. यावरून भाजपमध्ये सध्या सगळे आलबेल नसल्याचे चित्र आहे. पंकजा यांचे कार्यकर्ते सध्या त्यांनी पक्ष सोडावा अशी मागणी करत आहेत. कारण भाजपमधील नेत्यांनीच पंकजा यांच्य़ा पराभवासाठी प्रयत्न केल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. 

आणखी वाचा - देवेंद्र फडणवीस राऊतांकडे चहा प्यायला विसरले नाही

दरम्यान, याच धर्तीवर पंकजा मुंडे 12 तारखेला गोपीनाथ गडावर काय घोषणा करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खऱच मुंडे या पक्ष सोडणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde absent from party meeting