
महागाईवर पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारला सल्ला, म्हणाल्या...
तुळजापूर (जि.उस्मानाबाद ) : राज्याच्या माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गुरूवारी (ता.सात) तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. मुंडे यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने सहायक धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी सत्कार केला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ओबीसींचे आरक्षण (OBC Reservation) राहिले पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. आज मी सकाळी जोतिबाचे दर्शन घेऊन माझा दौरा सुरू केला आहे, असे सांगून महागाई कमी करण्यासाठी राज्य पातळीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) निर्णय घ्यावा.
हेही वाचा: Aurangabad News | पती-पत्नीचा वाद गेला विकोपाला, एकाने केली आत्महत्या
राजकारण्यांनी राज्यात स्वराज्य आणि सुराज्य आणावे असेही पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या. यावेळी सरकारी विश्रामगृहात आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, भाजपचे (BJP) तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, प्रवीण घुगे, अनिल काळे, उमेश गवते, विकास मलबा, सचिन अमृतराव, साहेबराव घुगे, गुलचंद व्यवहारे, नारायण नन्नवरे आदी उपस्थित होते.
Web Title: Pankaja Munde Advise Mahavikas Aghadi Government On Inflation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..