Pankaja Munde: "मला प्रचंड अपराधी वाटतेय..." पराभवामुळे समर्थकाने संपवले जीवन; पंकजांची भावूक पोस्ट

Beed Lok Sabha Election: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
Pankaja Munde
Pankaja Mundeesakal

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला. यावेळी राष्ट्रावादी शरद पवार पक्षाच्या बजरंग सोनावणे यांनी त्यांचा पराभव करत 15 वर्षांनी बीडमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला.

दरम्यान पंकजा मुंडे यांचा झालेल्या पराभव त्यांना जितका जिव्हारी लागला नाही, तितका त्यांच्या हितचिंतक आणि कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. अशात पंकजा मुंडे यांच्या एका कार्यकर्त्याने आपले जीवन संपवले आहे.

या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपल्या कार्यकर्त्यांना विनंती केली की, कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पंकजा म्हणाल्या, "स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याचे माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे संयम ठेवत आहे, तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी??मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्ही ही पचवा!

पंकजा पुढे म्हणाल्या, "अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक रहा प्लिज. माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा. आई बापाला दुःख देऊ नका. त्यांच्या जीवाला घोर लावू नका. तुम्हाला मुंडे साहेबांची शप्पथ आहे. 15 जूनपासून मी आभार दौरा करत आहे. तोपर्यंत सर्व जण प्रतिक्षा करा."

Pankaja Munde
Praful Patel: द्यायचे असेल तर कॅबिनेट द्या... फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अजित पवार स्पष्टच बोलले
Pankaja Munde
Modi Oath Ceremony : प्रतापराव जाधव यांच्या रूपाने जिजाऊंच्या जिल्ह्याला केंद्रीय मंत्री पदाचा बहुमान!

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने आंबाजोगाई तालुक्यातील पांडुरंग सोनावणे या तरुणाने आपले जीवन संपवले होते. इतकेच नव्हे तर 4 जून रोजी निकाल लागल्याच्या दिवशीच पाडुंरग याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्याच्या मित्रांनी त्याला रोखले होते. पण पाडुंरग याने आज आपल्या शेतात गळफास घेत जीवन संपवले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. ज्याने निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी जर पंकडा मुंडे यांचा परभव झाला तर जीवन संपवेन असा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com