esakal | ज्याची जात काढली त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, पंकजांकडून फडणवीसांचे कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde-devendra fadnavis

जात काढली त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, पंकजांकडून फडणवीसांचे कौतुक

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

बीड : भाजपकडून आज बीडमध्ये ओबीसी मेळावा (BJP obc melava beed) आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांचं कौतुक केलं. ज्या मुख्यमंत्र्यांची दररोज जात काढत होतात, त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला, तर फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली.

हेही वाचा: निवडणुकांमध्ये अन्याय खपवून घेणार नाही, पंकजा मुंडेंचा इशारा

अनेकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये आलबेल नसल्याच्या चर्चा रंगतात. पण, बीडमध्ये पंकजा मुंडेंनी फडणवीसांचे कौतुक केले. ''आता आपल्या राज्यात एक नवीन षडयंत्र सुरू झालं आहे. ओबीसी, बहुजनांच्या आरक्षणाचा मुद्दा उचलला तर कोणीतरी षडयंत्रकारी लोक मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरतात. मात्र, मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम देखील याच सरकारने केले आहे. ज्या मुख्यमंत्र्यांची रोज जात काढत होतात, त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. पण, ते आरक्षण देखील संपुष्टात आलं'', असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा बचाव करण्यासाठी आम्ही तडफडत आहोत. मात्र, हे आरक्षण देखील या सरकारमुळे संपुष्टात आलं आहे. हे आरक्षण नसेल तर ओबीसींच्या राजकीय भविष्याचे काय? ओबीसींच्या डोक्यावर सध्या टांगती तलवार आहे, असंही त्या म्हणाल्या. मराठा समाज शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करत आहे. तसेच ओबीसी समाजाची राजकीय आरक्षणाची मागणी आहे. या दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. आम्ही हा समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो. आम्ही सर्वांना बहुजन म्हणून संबधतो. ओबीसी समाजातील एखादा माणूस खुल्या प्रवर्गातून निवडून येईल. पण त्याला मुख्य पदावर जाण्याची संधी मिळणार आहे का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश टिकवून दाखवावा. निवडणुकीत या अध्यादेशाची अंमलबजावणी करून दाखवावी. सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देऊन या निवडणुका झाल्या आहेत. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसींचं आरक्षण खपवून घेणार नाही, असा इशारा देखील पंकज मुंडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

loading image
go to top