Pankaja Munde
Pankaja Mundeesakal

Pankaja Munde Video : ''मला नाकारलं गेलं.. अडचणी आणल्या गेल्या..'', पंकजा मुंडेंनी मांडल्या व्यथा

Published on

मुंबईः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा सुरु आहे. काल त्या बीडमध्ये होत्या. उपस्थित कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाट मोकळी करुन दिली.

पंकजा मुंडेंनी दोन महिन्यांसाठी राजकारणातून ब्रेक घेतला होता. आता श्रावण महिन्यात त्यांनी शिवशक्ती परिक्रमा सुरु केली आहे. ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी यात्रा सुरु केली आहे. त्यांना राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.

काल पंकजा मुंडेंची परिक्रमा बीड जिल्ह्यात दाखल झाली. बीडमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यांच्यासोबत खासदार प्रीतम मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचीही उपस्थिती होती.

Pankaja Munde
Uddhav Thackrey: जसं 'जालियानवाला बाग कांड' तसं'जालना'वाला घडवला; उद्धव ठाकरेंचा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी महाराष्ट्रात शिवशक्ती परिक्रमा सुरु केलेली आहे. राज्यामध्ये मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कदाचित बीड जिल्ह्याला वाटलं आपण कमी पडू नये म्हणून एवढं जंगी स्वागत करण्यात आलं.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, श्रावण मासात ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचं दर्शन घेण्यासाठी मी बाहेर पडले आहे. मी इतरांच्या जबाबदारीमध्ये नाक खुपसत नाही. माझ्याकडे जे काम दिलंय ते मी करत असते. मध्य प्रदेशची जबाबदारी दिली ती मी पार पाडते आहे.

Pankaja Munde
Uddhav Thackeray : २५ वर्षांत शिवसेनेची भाजप झाली नाही, तशीच काँग्रेसही होणार नाही; ठाकरेंचं प्रत्युत्तर

सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलतना पंकजा मुंडे म्हणाल्या की, या गोंधळातून बाजूला होवून विचार केला पाहिजे, म्हणून मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक घेते असं सांगणं सोपं नसतं. कोण कसा आहे ते जनतेला चांगलं माहिती असतं. गढूळ वातावरणात तुरटीचं काम करण्याची माझी इच्छा आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, आम्हाला तोल ढळू द्यायचा नाही. मला एवढ्या वेळा नाकारलं गेलं.. एवढ्या वेळा अडचणी आणल्या गेल्या परंतु मी अढळ राहिले. माझ्या कार्यकर्त्यांनीही तोल ढळू द्यायचा नाही, असा सल्ला त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com