
मी भाजप सोडणार, अशा वावड्या का उठल्या याचा शोध मी पण घेत आहे. दर वेळी माझ्याबद्दल अशा वावड्या उठवल्या जातात, अशी खंत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. मला पदे मिळू नयेत म्हणून अशा अफवा पसरविल्या जातात का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
पुणे : मी भाजप सोडणार, अशा वावड्या का उठल्या याचा शोध मी पण घेत आहे. दर वेळी माझ्याबद्दल अशा वावड्या उठवल्या जातात, अशी खंत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. मला पदे मिळू नयेत म्हणून अशा अफवा पसरविल्या जातात का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, 'मी माझे वडिल गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर माझ्या भावना व्यक्त करणार आहे. त्यानिमित्ताने माध्यमांमधून अनेक चर्चा सुरू झाल्या. मी पक्ष सोडणार, अशी चर्चा अचानक सुरू झाली. त्यानंतर काहींनी मी पक्षावर दबाव आणण्यासाठी हे करत असल्याचे बोलले जाऊ लागले. अशा चुकीच्या बातम्यांबद्दल मलाच आश्चर्य वाटत होते. खरेच माझे नीतीमत्ता एवढी स्वस्त झाली आहे का, असा प्रश्न मला पडतो. माझ्याबद्दल अशा काहीही बातम्या देताना कसलीच खात्री करून घेतली जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे
विधान परिषदेवर काम करणार किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारणार का, असा प्रश्न विचारला असता त्यावर विचार केला नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना कोंडीत पकडले जात आहे का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उत्तर दिले नाही. पण सर्वच पक्षांतील शिवसेनेचा अपवाद करता ओबीसी आमदारांत कुणबी आमदार किती आहेत, हे पण पाहायला हवे. काही समाजाच्या मोेर्चांचा मतांवर परिणाम झाला आहे का, असेही मला वाटते, असे त्यांनी सांगितले.