मी दुःख सांगावं असं सध्या कोणीही नाही - पंकजा मुंडे

Pankaja Mundes statement on she leaves BJP Party
Pankaja Mundes statement on she leaves BJP Party

पुणे : मी कोणाकडे माझं दुःख व्यक्त करावे असे सध्या माझ्याजवळ कोणी नाही. अनेकजण त्यांचेच दुःख माझ्याजवळ व्यक्त करत असतात असे भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. मी भाजपा सोडते आहे या वावड्या कुठून आल्या? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

मी नाराज नाही, इथं सगळे आम्ही एकत्र काम केलेले लोक आहोत. त्यांच्यावर काय नाराज व्हायचं? मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असं काहीही म्हटलं नव्हतं. अकारण नसताना या सगळ्या गोष्टी पसरवल्या गेल्या असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे बोलत होत्या.

गोपीनाथ गडावरील बॅनरवर ना कमळ ना भाजपनेते

पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपुर्वी फेसबुक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत दिले होते. आता १२ डिसेंबरच्या म्हणजे गुरुवारच्या एक दिवस आधी पंकजा मुंडे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत मी भाजप सोडणार या वावड्या कुणी उठवल्या असा प्रश्न त्यांनी विचारला. तसंच जे काही अंदाज लढवण्यात आले ते मीडियाने लढवले. मी त्याकडे शांतपणे पाहात होते असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

भाजपनेत्यांना मोठा धक्का; महाविकास आघाडी घेणार मोठा निर्णय

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री झाल्यावर शुभेच्छा दिल्या कारण ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथिविधी झाल्यावरही मी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी अजित पवारांनी आता वडिलांप्रमाणे काम कर असेही सांगितले असल्याचे पंकजा यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com