Pankaja Munde l पुरोगामी महाराष्ट्रात डागाने भरलेले मंत्रिमंडळ; महाविकास आघाडीवर पंकजा मुंडेंचे टीकास्त्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde

पुरोगामी महाराष्ट्रात डागाने भरलेले मंत्रिमंडळ- पंकजा मुंडे

सांगली: राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार डागाने भरलेले आहे, पुरोगामी महाराष्ट्र मध्ये आता असलेले सरकारचे मंत्रिमंडळ हे डागी मंत्रिमंडळ आहे अशी जोरदार टीका भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सांगली (Sangli) जिल्ह्याची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यासाठीचा हा त्यांचा पहिलाच दौरा होता. त्यांनी श्री गणरायाचे दर्शन घेऊन भाजप (BJP) नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

त्या म्हणाल्या, ‘‘राज्यातील सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. या स्थितीत भाजप पुन्हा ताकदीने उभा राहील आणि हे राज्य काँग्रेसमुक्त होईल, यासाठी आमचे धोरण ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला आहे, आम्ही तोच नारा महाराष्ट्रात दिला आहे.’’परवानगी नसली तरी ठाण्यात राज ठाकरेंची सभा होणारच- बाळ नांगदगावकर

हेही वाचा: परवानगी नसली तरी ठाण्यात राज ठाकरेंची सभा होणारच- बाळ नांगदगावकर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस टिकली पाहिजे, विरोधी पक्ष मजबूत असणे लोकशाहीसाठी गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले होते. त्याविषयी पंकजा मुंडे म्हणाल्या, गडकरी यांनी त्यांचे मत व्यक्त केले. त्याबद्दल काही बोलायचे नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या धोरणानुसार काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी धोरण आखले आहे.

हेही वाचा: हेमंत गडकरी म्हणाले, हनुमान चालिसा पठण मंदिरात करू; पण...

त्या म्हणाल्या, सांगलीत भाजपला बळकटी देण्यासाठी सर्व प्रकारचा बुस्टर दिला जाईल. त्यासाठी मी संवाद साधत आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्याबद्दल आमचा मनात आदर आहे. पण एक व्यक्ती गेला म्हनुन पक्ष संपला असे वाटत नाही असेही त्या म्हणाल्या. तसेच महादेव जानकर आमच्यापासून दूर जाऊ नयेत याची खबरदारी आम्ही घेऊ असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. तर ओबीसी आरक्षण टिकावे म्हणून कोल्हापूरला जाऊन जोतिबाला साकडे घातले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Pankaja Munde Criticism On Mahavikas Aghadi Visit In Sangli Political

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top