काळजी, दगदग नको करु ! तब्येतीला जप, पंकजा यांचा भाऊ धनंजय मुंडेंना सल्ला | Pankaja Munde Meet Dhananjay Munde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde And Dhananjay Munde

काळजी, दगदग नको करु ! तब्येतीला जप, पंकजा यांचा भाऊ धनंजय मुंडेंना सल्ला

मुंबई : प्रकृतीच्या अस्वाथ्यामुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई (Mumbai) येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज बुधवारी (ता.१३) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच बहीण पंकजा मुंडे यांनीही ब्रीच कँडीत जाऊन भाऊ धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काळजी, दगदग नको करु ! तब्येतीला जप, शेवटी तब्येत महत्त्वाची आहे, असा सल्ला पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना दिला. (Pankaja Munde Meet Brother Dhananjay Munde In Hospital)

हेही वाचा: औरंगाबादमधील राम नवमी मिरवणुकीचा Viral Video; मशिदीजवळून जाताना 'भाईचारा'

यावेळी मातोश्री प्रज्ञा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे आदी उपस्थित होते. धनंजय तब्येतीला जपल पाहिजे. दगदग करु नकोस. काळजी करुन नकोस. तब्येतीला सांभाळणं महत्त्वाचे आहे, असा सल्ला पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाऊ धनंजय मुंडे यांना दिला.

हेही वाचा: सांगलीची परिस्थिती समजून घेते मग दुरुस्त्या करूया;पंकजा मुंडे

धनंजय मुंडेंना मंगळवारी (ता.१२) सकाळपासून अस्वस्थ वाटत होते. ते सायंकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी होते. येथे सायंकाळी त्यांना अचानक चक्कर आली. नंतर मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Web Title: Pankaja Munde Meet Brother Dhananjay Munde In Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top