पंकजा मुडेंचे राजकीय पुनर्वसन; होणार 'या' पदावर निवड?

वृत्तसंस्था
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मुंबई : महाराष्ट्रातील भाजपमधील असणाऱ्या महिला नेत्यांमधील प्रबळ नेत्या म्हणजे पंकजा मुंडे या होय. पंकजा यांचा विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाला. त्यामुळे त्यांनी पक्षाने आपली नाराजी व्यक्त केली होती. आता याचीच दखल पक्षाने घेत त्यांना राजकीय पुनर्वसन करून राजकीय जीवदान दिले जाणार असल्याची माहिती आहे. पंकजा यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यातल्या भाजपा नेत्यांमध्ये याबद्दल एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेला होता घर सावरायला पण, काळाचा आला घाला!

दरम्यान, आजपासून भाजपाच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात पंकजा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होऊ शकतं. एप्रिलमध्ये विधान परिषदेच्या आठ जागा रिक्त होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून नावांची चाचपणी सुरू आहे. याशिवाय इच्छुकांचीदेखील मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपाकडे जास्त संख्याबळ असल्यानं त्यांना काही उमेदवारांना सहज विधान परिषदेवर पाठवता येतील.

त्यामध्ये पंकजा यांचं आघाडीवर असल्याचं समजतं. विधानसभा निवडणुकीत बीडच्या परळी मतदारसंघात पंकजा यांचा पराभव झाला होता. त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी त्यांना पराभूत करत विधानसभा गाठली. या निवडणुकीत स्वकियांनीच दगाफटका केल्याची भावना निर्माण झाल्यानं पंकजा पक्षावर नाराज आहेत. त्या पक्षांतर करणार असल्याची चर्चादेखील सुरू होती.

PHOTOS : शेवटी आईच 'ती'...बाळाला कसं सोडू शकते! अखेर ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..

पक्षातल्या इतर नाराज नेत्यांसोबत त्यांनी भगवानगडावर समर्थकांचा मेळावादेखील घेतला. त्यात त्यांनी पक्षाच्या कोअर कमिटीतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या याच नाराजीची पक्षानं दखल घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. ओबीसी समाजाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या त्या भाजपामधल्या महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात.

अनेक वर्षे आमदार आणि पाच वर्ष मंत्री म्हणून काम केल्यानं त्यांच्याकडे संसदीय कामाचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा पक्षाला विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी फायदा होऊ शकतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pankaja munde might be bjps candidate mlc election