Pankaja Munde I पवार साहेबांनी वय पाहून, वॉर्निंग देऊन केतकीला सोडून द्यावं - पंकजा मुंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

केतकी चितळे एक वॉर्निंग देऊन सोडून द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.

'पवार साहेबांनी वय पाहून, वॉर्निंग देऊन केतकीला सोडून द्यावं'

सध्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर अभिनेत्री केतकी चितळेने आक्षेपार्ह शब्दांत केलेल्या टीकेमुळे आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहेत. ठाणे कोर्टाने केतकीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केतकीची पाठराखण केली आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीली प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, केतकी चितळे एक वॉर्निंग देऊन सोडून द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, केतकीच्या वयाचा विचार करता एक वॉर्निंग देऊन तिला सोडून द्यावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

त्या म्हणाल्या, सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हा जरी व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय असला तरीही सर्वांचा सन्मान झाला पाहिजे. टीका जरी करायची असली तरीही बिभत्सपणे करु नये. त्या पोस्टमध्ये बिभत्सपणा मला आढळला यासाठी मी त्याची निंदाच करते. मी राजकारण लहानपणापासून जवळून पाहिलं आहे. तेव्हा सोशल मीडिया नव्हता. लोकं पेपरमध्ये लिहायची. तेव्हाही अनेकदा भाषा घसरायची.

आम्ही अनेकदा बाबांना विचारायचो की अशा भाषेत लिहीलेलं तुम्ही सहन कसं करता? तेव्हा ते म्हणायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतू आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वेगळा अर्थ काढला जातो आहे. परंतु सध्या तीच वय पाहता तिला एक वॉर्निंग देऊन सोडून द्यायला हवं. पवार साहेब मोठे नेते आहेत, असं पंकजा मुंढे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, बुधवारी ठाणे कोर्टाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तिच्या वकीलांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. सध्या केतकी गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात आहे. परंतू केतकीच्या जामीन अर्जावरचा निर्णय ठाणे कोर्टाने राखून ठेवला आहे. सरकारी पक्ष आणि तपास अधिकाऱ्यांची बाजू ऐकल्यानंतर कोर्ट या प्रकरणात आपला निर्णय देणार आहे.