पानसरे हत्याप्रकरण : ६ आठवड्यात प्रगती अहवाल द्या; ATS ला न्यायालयाचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pansare murder case  Give progress report in 6 weeks Court orders to ATS mumbai

पानसरे हत्याप्रकरण : ६ आठवड्यात प्रगती अहवाल द्या; ATS ला न्यायालयाचे आदेश

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी (एटीएस) पथकाला मुंबई उच्च न्यायालयाने सहा आठवड्यात प्रगती अहवाल दाखल करण्याचे निर्देश शनिवारी दिले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने सहा वर्षांनंतर नुकतेच एक विशेष पथक नव्याने नियुक्त केले आहे. यात एटीएसचे १० अधिकारी आणि गुन्हे शाखेचे तीन अधिकारी यांचा समावेश आहे.

पानसरे यांच्या हत्येचा तपास यापूर्वी विशेष पथकाकडे होता; मात्र सहा वर्षांत विशेष धागेदोरे तपासात उघड झाले नाही, असा आरोप पानसरे यांच्या मुलीने अर्जाद्वारे केला आहे. तसेच तपासासाठी एटीएसचे पथक नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने हा तपास एटीएसकडे वर्ग केला आहे. राज्य सरकारच्या वतीने ॲड. अशोक मुंदरगी यांनी पथकाबाबत खंडपीठाला माहिती दिली. त्यानंतर खंडपीठाने तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश एटीएसला दिले.

पुण्यात घुमला विवेकाचा आवाज

पुणे : ‘हम लढेंगे, हम जितेंगे’, ‘विवेकाचा आवाज बुलंद करुयात, अशा घोषणा देत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’मध्ये सहभाग घेत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना नवव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी डॉ.बाबा आढाव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील आदी उपस्थित होते.