ऐन दिवाळीत पनवेल गाडी पुन्हा रद्द; मराठवाड्यातील प्रवाशांवर अन्याय

Panvel train again canceled in Diwali
Panvel train again canceled in Diwali

नांदेड : मध्य रेल्वेने कळविल्यानुसार कर्जतजवळ रेल्वे पटरीच्या कामामुळे अप लाईन मेल एक्सप्रेस गाड्यांकरिता उपलब्ध राहणार नाही. यामुळे नांदेडकडून पनवेलकडे जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. ऐन दिवाळीत ह्या गाड्या रद्द केल्याने मराठावाड्यातील प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.  

- गाडी संख्या 07617  नांदेड ते पनवेल विशेष गाडी ता. 26 ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. 

- गाडी संख्या 07618 पनवेल ते नांदेड विशेष गाडी ता. 27  ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. 

- गाडी संख्या 17614 नांदेड ते पनवेल एक्सप्रेस ता. 21 ते 25 आणि ता. 27 ते ता. 31 ऑक्टोबर दरम्यान पुणे ते पनवेल दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. नांदेड ते पुणे नियमित वेळेनुसार धावेल. 

- गाडी संख्या 17613  पनवेल ते नांदेड एक्सप्रेस दिनांक ता. 22 ते 26 आणि ता. 28 ते एक नाेव्हेंबर   दरम्यान पनवेल ते पुणे दरम्यान अशंतः  रद्द करण्यात आली आहे. पुणे ते नांदेड नियमित वेळेनुसार धावेल. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने कळविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com