
नाशिककर आणि मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. नाशिक - मुंबई रेल्वेमार्गावर आता समांतर रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायक होणार आहे. रेल्वे प्रशासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४ हजार कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे.