Anil Deshmukh: स्वत:ला वाचवण्यासाठी परमबीर-वाजे एक झाले; अनिल देशमुखांचा कोर्टात दावा

Parambir-Singh-Anill-Deshmukh
Parambir-Singh-Anill-Deshmukhsakal media

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी सचिन वाजे हे एकमेकांना मिळालेले आहेत. त्यांनी स्वत:चं रक्षण करण्यासाठी आपल्यावर आरोप केल्याचं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयातील भ्रष्टाचाराच्या खटल्यात दाखल केलेल्या जामीन अर्जात म्हटलं आहे. (Ekanth Shinde news in Marathi)

Parambir-Singh-Anill-Deshmukh
Dasara Melava: एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी केसरकरांना डुलकी; फोटो आले समोर

गुरुवारी विशेष सीबीआय न्यायालयाला दिलेल्या अर्जात, देशमुख यांनी दावा केला की, त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप हे केवळ तपास यंत्रणांच्या लहरीपणा ​आणि कल्पनांवर आधारित आहेत. यामुळे ज्या विधानांवर सीबीआयने हे संपूर्ण प्रकरण घडवले, त्यावरही आता प्रश्नचिन्ह होत आहे.

देशमुख यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून अटक केली होती. ते सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी त्यांना ईडीने नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. परंतु 13 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती आदेशही जारी केला, ज्यामुळे एजन्सी या निकालाविरुद्ध अपील करू शकत नाही. दुसरीकडे सीबीआय देशमुख यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचाही तपास करत आहे.

Parambir-Singh-Anill-Deshmukh
Dasara Melava: एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी केसरकरांना डुलकी; फोटो आले समोर

देशमुख यांनी त्यांचे वकील अनिकेत निकम आणि इंद्रपाल सिंग यांच्यामार्फत भ्रष्टाचार प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयात न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्यासमोर जामिनासाठी अर्ज केला आहे. अर्जात देशमुख यांनी दावा केला की, त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तपास यंत्रणेच्या लहरीपणा आणि कल्पनांवर आधारित आहे. तसेच सीबीआयचे संपूर्ण प्रकरण ज्या विधानावर आधारित आहे ते विधान पूर्णपणे संशयास्पद असून विधान करणाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत असल्याचही अर्जात म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com