पालकांनो, आजारी मुलांना शाळेत पाठवूच नका! वातावरण बदलले, आजारी पडण्यापूर्वी प्रत्येकांनी करावेत ‘हे’ घरगुती उपाय, वाचा...

पावसामुळे मुलांना विषाणूजन्य सर्दी, तापीचा त्रास होत आहे. ही मुले शाळेत गेल्यानंतर वर्गात शेजारी बसलेल्या मुलांना देखील हवेतून विषाणूजन्य संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे आजारी मुलांना बरे होईपर्यंत शाळेत पाठवू नये, असेही डॉक्टर सांगतात.
Sickness
Sicknesssakal
Updated on

सोलापूर : चार दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे सर्दी, ताप यासह विषाणूजन्य आजाराचा जोर वाढला आहे. रुग्णालयात ५० टक्के रुग्ण याच आजारांच्या लक्षणाची आहेत. मागील काही दिवसांपासून शहर परिसरात पावसाने अखंड हजेरी लागली आहे. रोज केवळ काही तासापूरते सूर्यदर्शन झाले आहे. अधूनमधून पडणारे ऊन लगेच ढगाळ वातावरणाने गायब होत आहे.

पावसाने वातावरणात गारवा वाढला आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार वाढले आहे. गारव्‍यामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. अचानक अंगात ताप भरून येण्याचे प्रकार होत आहेत. अनेक वेळा तापीचे कारण न समजल्याने आजार गंभीर रुप धारण करतात. विशेषतः लहान मुलांची या काळात अधिक काळजी घ्यावी लागते.

‘हे’ नक्की कराच...

  • सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावे

  • बाहेर जाताना कान, नाक बंद ठेवण्यासाठी स्कार्फ, रुमाल वापरा

  • बाहेरचे तेलकट पदार्थ खाऊ नयेत

  • तुळस, सुंठ, दालचिनी, हळदीचा काढा घ्यावा

  • कोणतेही थंड पदार्थ खाऊ नये, थंड पेय्य टाळावे

  • विविध भाज्यांचे गरम सूप घ्यावे

आजारी मुलांना शाळेत पाठवू नये

पावसामुळे मुलांना विषाणूजन्य सर्दी, तापीचा त्रास होत आहे. ही मुले शाळेत गेल्यानंतर वर्गात शेजारी बसलेल्या मुलांना देखील हवेतून विषाणूजन्य संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे आजारी मुलांना बरे होईपर्यंत शाळेत पाठवू नये, असेही डॉक्टर सांगतात.

आठवडाभराचे तापमान (अंश सेल्सिअस)

  • वार कमाल किमान

  • मंगळवार २९ २३

  • बुधवार २९ २३

  • गुरुवार २५ २२

  • शुक्रवार २४ २२

  • शनिवार २५ २२

  • रविवार २७ २२

  • सोमवार २६ २२

  • मंगळवार २५ २३

सलग पावसामुळे विषाणूजन्य आजाराचे रुग्ण वाढले

सध्या रुग्णालयात रोजची ओपीडी दीड हजार रुग्णांची आहे. जुन्या आजारांचे रुग्ण सातत्याने नियमित तपासणीसाठी असतात. तरीही पावसामुळे आता विषाणूजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यासोबत खोकला व ताप असलेले रुग्ण देखील आहेत.

- डॉ. संपत तोडकर, वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर

-------------------------------------------------------------------------------

सुर्यदर्शन कमी होते तेव्हा विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढतो

पावसामुळे सध्या सूर्यदर्शन कमी झाले आहे. अशावेळी विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आजारपणाची लक्षणे असतील तर थेट उपचार घ्यावेत.

- डॉ. स्मित जानराव, सहा. प्राध्यापक, मेडिसीन विभाग, वैशंपायन वैद्यकीय रुग्णालय, सोलापूर

----------------------------------------------------------------------

बाहेरील अन्नपदार्थ घेऊ नयेत

ढगाळ वातावरण, सलग पाऊस असतो तेव्हा त्या कालावधीत सूर्यदर्शन कमी होते. या स्थितीत प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. कोमट पाणी घ्यावे, गरम सूप व साधे ताजे अन्न खावे आणि बाहेरील अन्नपदार्थ घेऊ नयेत.

- डॉ. रेणुका शिरेगोंड, आयुर्वेद तज्ज्ञ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com