पालकांनो मुलांची काळजी घ्या..! सोलापूर जिल्ह्यात डोळे आलेले ५०० रुग्ण; चिमुकले सर्वाधिक; ‘अशी’ घ्या खबरदारी

इंटेरो व्हायरसचा प्रसार वेगाने होत असल्याने जिल्ह्यातील डोळे आलेल्या रुग्णांची संख्या तीन-चार दिवसांतच पाचशेवर पोचली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. एकमेकांच्या संपर्कातून ही साथ झपाट्याने पसरत आहे.
स्वच्छतेवर लक्ष द्या-
हात स्वच्छ धुणे
स्वच्छतेवर लक्ष द्या- हात स्वच्छ धुणेesakal

सोलापूर : इंटेरो व्हायरसचा प्रसार वेगाने होत असल्याने जिल्ह्यातील डोळे आलेल्या रुग्णांची संख्या तीन-चार दिवसांतच पाचशेवर पोचली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. एकमेकांच्या संपर्कातून ही साथ झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे चष्मा वापरा, हाताची स्वच्छता ठेवा, डोळ्याला हात लावू नका, डोळे आल्यावर इतरांपासून दूर राहा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सोलापूर शहरात डोळे आलेल्या रुग्णांची संख्या आता १९६ झाली असून ग्रामीणमध्ये तीनशेवर रुग्ण आहेत. चार-पाच दिवसानंतर बरे झालेले शंभर रुग्ण आहेत. पण, संसर्गजन्य या आजारामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

कंजंक्टिव्हायटिस विषाणूंमुळे, रोगजीवाणूंमुळे, परागकण किंवा धूर किंवा धुळीसारख्या ॲलर्जीकारकांमुळे हा आजार झपाट्याने पसरत आहे. पावसाळ्यात हा आजार पसरतो. लहान मुलांसह प्रौढांमध्ये याचा संसर्ग सर्वाधिक आहे. दरम्यान, पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून आता सोलापूर शहरातील खड्डे माती (मुरूम) टाकून बुजविले जात आहेत.

अगोदरच पावसामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे, त्यात आता मुरूम टाकला जात असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. डोळ्यात धूळ जात असल्याने अनेकांना श्वसनाचा त्रास देखील होत असल्याची स्थिती आहे. दुसरीकडे डोळे जळजळ करीत असल्याचीही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी घराबाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

शाळांकडून पालकांना स्वतंत्र मेसेज

सध्या डोळे येण्याची साथ झपाट्याने वाढत आहे. संसर्गजन्य आजार असल्याने एकाच्या संपर्कातून दुसऱ्यांनाही तो आजार होऊ शकतो. त्यामुळे ज्या मुलांचे डोळे आले आहेत, त्यांनी त्यांच्या वर्गशिक्षकांशी संपर्क करून बरे होईपर्यंत शाळेत येवू नये, असे आवाहन शाळांनी पालकांना केले आहे. मुलांना बरे होईपर्यंत शाळांनी सुटी घेण्याची परवानगी दिली आहे. आरोग्य विभागासह शिक्षण विभागानेही तशा सूचना केल्या आहेत.

आजाराची लक्षणे...

  • - श्लेष्मल निघणारे, लाल आणि सुजलेले डोळे, पाणावलेले डोळे

  • - बोचरी संवेदना, खाज, जळजळ, दाह; चिकटपणा जाणवतो

  • - पापण्या किंवा पापण्यावरच्या केसांवर रखरखीत थर जमा होतात

  • - डोळ्यांना सूज येते, डोळे लालसर होतात, डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर पडतो

नागरिकांनी ‘अशी’ घ्यावी खबरदारी

  • - हात नियमितपणे स्वच्छ धूवावेत, कपडे व स्वत:च्या वस्तू देखील स्वच्छ ठेवाव्यात

  • - चष्मे व हातरूमाल दुसऱ्यांना वापरायला देऊ नका; डोळे चोळू नका

  • - उन्हापासून, वाऱ्यापासून व धुळीपासून डोळ्याचे रक्षण व्हावे म्हणून चष्मा वापरावा

  • - डोळे आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑफ्थाल्ममोलॉजिस्टनी सुचवलेले आय ड्रॉप्स वापरावेत

वैद्यकीय सल्ल्यानेच उपचार घ्यावेत

डोळे येण्याचे प्रमाण वाढत असून पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी. संसर्गजन्य आजार असल्याने एकमेकांच्या संपर्कातून हा आजार वाढत आहे. त्यामुळे डोळे आलेल्यांनी इतरांपासून दूर राहावे, स्वच्छता व डोळ्यावर चष्मा वापरावा. वैद्यकीय सल्ल्यानेच उपचार घ्यावेत, गावठी उपचारामुळे डोळ्याला गंभीर इजा होऊ शकतात.

- डॉ. बसवराज लोहारे, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com