लोकसभेतील पराभवानंतर पार्थ पवार आता लढविणार विधानसभा?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

- पार्थ पवार आता विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता.

- विधानसभा लढवायची की नाही याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आता विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. विधानसभा लढवायची की नाही याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल, असे अजित पवार यांनी सांगितले. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढवतील, अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. आता यावर स्वत: अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा लढवायची की नाही याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल. तसेच विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत आघाडीची सकारात्मक चर्चा झाली आहे, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत जनता आम्हालाच कौल देईल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parth Pawar may Contest Assembly Election