esakal | अकरावी प्रवेशाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ फेरीत अंशत: बदल
sakal

बोलून बातमी शोधा

 admission

अकरावी प्रवेशाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ फेरीत अंशत: बदल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ फेरी दरम्यान सुट्या येत असल्यामुळे यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकामध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे. त्याप्रमाणे या फेरीतील तिसऱ्या संवर्गातील म्हणजेच ७० टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार (ता.४) ते मंगळवार (ता.५) दरम्यान प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार चौथ्या संवर्गासाठी (६० टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण) ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान, तर पाचव्या संवर्गासाठी (५० टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण) ९ ते ११ ऑक्टोबर, सहाव्या संवर्गासाठी (दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांसाठी) १२ ते १३ ऑक्टोबर, सातव्या संवर्गासाठी (एटीकेटी सवलत मिळालेले व दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी) १४ ते १८ ऑक्टोबर दरम्यान प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे. या फेऱ्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी उर्वरित रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक ‘https://pune.11thadmission.org.in/’ या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल, अशी माहिती राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.

loading image
go to top