आयाराम विरोधी बाकांवरच!; आता विकासाचे काय?

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 27 November 2019

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते -
शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा), बबनराव पाचपुते (श्रीगोंदा), वैभव पिचड (अकोले), राणा जगजितसिंह पाटील (तुळजापूर), नमिता मुंदडा (केज), गणेश नाईक (बेलापूर) 

राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या पुढील नेत्यांना मात्र नवीन समीकरणामुळे दिलासा मिळाला आहे - पांडुरंग बरोरा (शहापूर), भास्कर जाधव  (गुहागर), जयदत्त क्षीरसागर (बीड), रश्‍मी बागल (करमाळा), सचिन अहिर (वरळी)

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले -
जयकुमार गोरे (माण), कालिदास कोळंबकर (वडाळा), राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), नितेश राणे (कणकवली), काशिराम पावरा (शिरपूर), गोपालदास आग्रवाल (गोंदिया), हर्षवर्धन पाटील (इंदापूर), मदन भोसले (वाई), रवीशेठ पाटील (पेण), भरत गावित (नवापूर) 

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालीच सत्ता येणार असल्याच्या भावनेतून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची आताही विरोधातच बसण्याची नामुष्की ओढवली आहे. 

अजित पवार राष्ट्रवादीत पुन्हा सक्रीय; बैठकीत थेट मंचावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता आल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये महाभरती झाली. यापैकी काही नेत्यांनी शिवसेनेतही प्रवेश केल्याने त्यांचे चेहरे सध्याच्या राजकीय वातावरणात आनंदी दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही काँग्रेसचे प्रमुख नेत्यांनीच पक्ष सोडल्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र होते.

भाजपच्या घटकपक्षांची परवड; 'या' नेत्यांच्या आशेवर पाणी

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारादरम्यान राज्यातील वातावरण ढवळून काढले. त्यामुळे दोन्ही काँग्रेसचे ९८ आमदार निवडून आले. तसेच निवडणुकीच्या निकालानंतर पवार यांनी राजकीय घडामोडींची सूत्रे स्वतः हातात घेतल्याने सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेपासून रोखले आहे. राज्याच्या सत्तास्थापनेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन आघाडी उदयास आल्याने या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर येणार आहे. त्यामुळे सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर मोठी नामुष्की ओढवली असून, त्यांना पुन्हा एकदा विरोधातच बसावे लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 
भाजपचे सहयोगी पक्ष असलेल्या नेत्यांची अवस्थाही केविलवाणी झाल्याचे चित्र आहे.

गेल्या सरकारमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, रिपब्लिकन पक्षाचे अविनाश महातेकर मंत्री आणि राज्यमंत्री होते. विनायक मेटे यांना देखील नवीन सरकारमध्ये मंत्री होण्याची इच्छा व्यक्‍त केली होती. मात्र भाजपला आता विरोधी पक्षात बसावे लागण्याचा शक्‍यता असल्याने सहयोगी पक्षांच्या नेत्यांचीही मोठी अडचण झाल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: party change leaders opposition pary development politics