स्वार्थी लोकांकडून पक्षबदल - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना-भाजपशी जवळीक करणाऱ्या नेत्यांवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

स्वतःच्या संरक्षणासाठी ही मंडळी पक्ष बदलत आहेत. स्वतःच्या संस्था, कारखाने वाचविण्यासाठी हे स्वार्थी आणि सत्तेसाठी हापापलेले लोक पक्षातून निघून जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना-भाजपशी जवळीक करणाऱ्या नेत्यांवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

स्वतःच्या संरक्षणासाठी ही मंडळी पक्ष बदलत आहेत. स्वतःच्या संस्था, कारखाने वाचविण्यासाठी हे स्वार्थी आणि सत्तेसाठी हापापलेले लोक पक्षातून निघून जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. 

हे लोक पक्षातून निघून गेले तरी नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही पक्षसंघटन मजबूत करू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पवार आज सोलापुरात आले होते. या मुलाखतींनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, ‘‘सत्तेत राहूनही मोर्चे कशाला काढता? अधिकाऱ्यांना आदेश देण्याचे काम तुम्ही करायला हवे. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवायला हवे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच हे सर्व काही केले जात आहे. जनतेच्या प्रश्‍नांचे त्यांना काही देणे-घेणे नाही.’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Party changes by selfish people Ajit Pawar Politics