
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ महाराष्ट्रातला पक्ष. त्याची ताकद केवळ महाराष्ट्रातच, अशी टीका विरोधक करत असतात. पण, राष्ट्रवादी काँग्रेसने वेळोवेळी महाराष्ट्राबाहेरही आपण ताकद दाखवू शकतो हे सिद्ध केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींवेळी केवळ एका प्रसंगातून त्याची प्रचिती आली. आज, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त या प्रसंगाला उजाळा मिळत आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
केरळमध्ये आमदार
मुळात राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्राबाहेर ताकद काय? असा प्रश्न नेहमी त्यांचे विरोधक करत असतात. पण, केरळपासून मेघालय पर्यंत राष्ट्रवादीचं काही ना काही अस्तित्व आपल्याला जाणवतं. केरळ मुळात वेगळ्या विचारांचं राज्य आहे. शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसपासून केरळमध्ये त्यांचे काही फॉलोअर्स आहेत. पक्षाचा केरळमध्ये खूप मोठा विस्तार झालेला नसला तरी, केरळमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. सध्याच्या सभागृहात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. यासह मेघालय, गुजरात, झारखंड आणि गोव्यात पक्षाचा एक आमदार आहे.
-----------
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दोन दहशतवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात ११ ठार
-----------
धक्कादायक! आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू
----------
फेक बातम्यांच्या धर्तीवर सरकारच करणार आता फॅक्ट चेक; कसं ते वाचा?
-----------
दिल्लीत अॅक्टिव्ह युनिट
राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राच्याबाहेर काय करू शकतो. हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्राला दिसलं. सत्ता स्थापनेच्या संघर्षात राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ, नितीन पवार, अनिल पाटील आणि दौलत दरोडा हे आमदार बेपत्ता होते. त्यांना दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. इकडं महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाआघाडीच्या संख्याबळाची जुळवा जूळव सुरू होती. पक्षावर बाका प्रसंग ओढवला होता. अशावेळी पक्षाचं दिल्ली युनिट कामी आलं. पक्षाचे चार आमदार दिल्लीतल्या हॉटेलमध्ये असल्याची माहिती शरद पवार यांना मिळाली होती. त्यांनी दिल्लीतल्या युवक राष्ट्रवादीच्या नेत्या सोनिया दुहान यांच्याकडं या चार आमदारांची जबाबदारी सोपवली होती. त्या चारही आमदारांशी संपर्क झाल्यानंतर सोनिया दुहान यांनी त्यांना केवळ हॉटेलच्या पार्किंगमध्ये पोहोचण्याचं सांगितलं होतं. तिथं त्यांच्यासाठी कार तयार होती. ती कार चारही आमदारांना घेऊन विमानतळावर पोहोचली आणि आमदारांनी मुंबई गाठली. हा प्रसंग त्यावेळी महाराष्ट्राच्याच नव्हे तर, देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला होता. या एका प्रसंगामुळं तरुणीनं पक्षाची दिल्लीतली ताकद दाखवून दिली. त्याचबरोबर पक्षाचं दिल्लीतलं युनिट किती ऍक्टिव्ह आहे याचीही प्रत्यय आला.
संसदेत अभ्यासू प्रतिनिधी
संसदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण नऊ सदस्य आहेत. त्यात राज्यसभेमध्ये स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, फौजीया खान आणि वंदना चव्हाण हे सदस्य आहेत. तर सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, डॉ. अमोल कोल्हे आणि श्रीनिवास पाटील हे लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत आहेत. पक्षाचे हे सर्व सदस्य अभ्यासू आणि अनुभवी असल्याचं वारंवार दिसलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.