विद्यार्थ्यांना एसटीचा सवलत पास 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 जानेवारी 2017

मुंबई - पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेतील विद्यार्थ्यांना एसटीचा सवलत पास देण्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करून त्यांना उद्योग, सेवा तसेच रोजगार, स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात व्यापक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या दोन्ही योजना राज्यात राबविल्या जाणार आहेत.

मुंबई - पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेतील विद्यार्थ्यांना एसटीचा सवलत पास देण्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करून त्यांना उद्योग, सेवा तसेच रोजगार, स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात व्यापक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या दोन्ही योजना राज्यात राबविल्या जाणार आहेत. या योजनांतर्गत व्यवसाय प्रशिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ प्रवासखर्चाअभावी कौशल्य प्रशिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येऊ नये, या हेतूने त्यांच्या प्रवास खर्चात एसटी महामंडळामार्फत सवलत देण्याचा प्रस्ताव रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महामंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या गावापासून प्रशिक्षण केंद्रापर्यंत (त्या गावापर्यंत) जाण्यासाठी एसटी सवलत पास देण्यात येईल. ही सवलत एसटीच्या इतर शैक्षणिक सवलतीप्रमाणे असेल, अशी माहिती रावते यांनी दिली.

Web Title: Pass discounts for students ST

टॅग्स