महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेले प्रवासी कोल्हापूरसाठी रवाना

टीम ई-सकाळ
शनिवार, 27 जुलै 2019

बदलापूर-वांगणी येथे महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एका स्पेशल ट्रेनने कोल्हापूरला रवाना करण्यात येत आहे. सदर ट्रेनचा मार्ग हा कल्याण-नाशिक-दौंड-कुर्डुवाडी-कोल्हापूर असा असणार आहे.

मुंबई : बदलापूर-वांगणी येथे महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एका स्पेशल ट्रेनने कोल्हापूरला रवाना करण्यात येत आहे. सदर ट्रेनचा मार्ग हा कल्याण-नाशिक-दौंड-कुर्डुवाडी-कोल्हापूर असा असणार आहे. याबाबतची माहिती राज्य आपत्कालीन नियंत्रण विभागाकडून देण्यात आली.

या सर्व प्रवाशांसाठी ही स्पेशल ट्रेन म्हणून सोडली आहे. त्यामुळे सदर ट्रेनला कोणताही विशिष्ठ असा क्रमांक देण्यात आलेला नाही. महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून सुखरूप सुटका झालेले व रेल्वे मार्गे घरी जाणारे प्रवासी कुर्डूवाडीमार्गे उद्या सकाळी नऊ वाजता मिरज रेल्वे स्टेशनवर पोहोचतील, अशी माहितीही देण्यात आली.

यामध्ये मिरजचे 39, कोल्हापूरचे 50, सांगलीचे 15, जयसिंगपूर व हातकणंगलेचे 22, कराडचे 3 साताऱ्याचे 20 प्रवासी असे एकूण 150 प्रवासी असणार आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passenger stranded in Mahalaxmi Express departs for Kolhapur