पतंजलीवर तुकाराम मुंढेंची धडक कारवाई, २,२७९ लिटर गाईचे तूप FDAकडून जप्त; चुकीचे लेबलिंग अन् भेसळीचा संशय

Patanjali FDA Action: पतंजलीवर एफडीएच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत २,२७९ लिटर गाईचे तूप जप्त करण्यात आले आहे.
Patanjali FDA Action

Patanjali FDA Action

ESakal

Updated on: 

मुंबई : सणासुदीच्या काळात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत बृहन्मुंबई विभागातील पाच आस्थापनांची तपासणी करून दोन हजार ३५२ किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. तसेच अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील नऊ आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली.

Loading content, please wait...