
Santosh Bangar: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नुकताच १० लाखांच्या डिपॉझिट अभावी अॅडमिशन नाकारल्यानं एका गर्भवती महिलेच्या मृत्यू झाला आहे. या घटनेनं महाराष्ट्र हादरलेला असतानाच आता पुन्हा एकदा अकोल्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. एका रुग्णाला डिपॉझिट न भरल्यामुळं अॅडमिशन नाकारलं आहे. यामुळं हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी या खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींवर संताप व्यक्त केला आहे. याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.