
Dinanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी अखेर राजीनामा दिला आहे. यानंतर रुग्णालयाचे डीन अर्थात प्रमुख डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत रुग्णालयाची भूमिका स्पष्ट केली. तसंच डिपॉजिट स्विकारण्याबाबतही रुग्णालयानं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या दिवशी काय राहू-केतू होता माहिती नाही, असं डॉ. केळकर यांनी म्हटलं आहे. तसंच पत्रकारांचा प्रश्नांचा भडीमार होऊ लागल्यानं त्यांनी पत्रकार परिषदही गुंडाळली.