सागर पनाड, लोणार: लोणार ग्रामीण रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका रुग्णाचा होरपळून दुर्दैवी मुत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच याबाबत पुढील चौकशी सुरू आहे. .मिळालेल्या माहितीनुसार, लोणार शहरातील बसस्थानकात २२ डिसेंबर २०२४ रोजी अनोळखी व्यक्ती झोपलेल्या स्थितीमध्ये दिसून आला. त्यानंतरक लोणार बसस्थानक वाहतूक नियंत्रक संजय राठोड यांनी १०८ वर फोन करून त्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात पाठवले. लोणार ग्रामीण रुग्णालयात त्या व्यक्तीला भरती करण्यात आले. त्यांची प्राथमिक तपासणी करून उपचार करण्यात आले. त्यानंतर या व्यक्तीला बुलढाणा येथे पुढील उपचारासाठी पाठवण्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र व्यक्तीसोबत नातेवाईक नसल्याने त्यांना एकटे पाठवणे जमत नसल्याने डॉ.फिरोज शहा यांनी या बाबतची माहिती लोणार पोलिसांना दिली. त्या व्यक्तीला लोणार ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले. .त्यानंतर तो व्यक्ती बिडी ओढत असल्याचे लक्षात आल्याने रुग्णालयातील कर्मचारी यांनी त्यांना बिडी ओढू नकोस सांगितले. मात्र रात्रीच्या वेळेस कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक उद्धव वाटसर यांना २३ डिसेंबर २०२४ च्या पहाटे ३ वाजून २० मिनिटे वाजे दरम्यान रुग्णाच्या वार्डातून धूर निघत असल्याचे दिसून आले. सदर कर्तव्यावर असलेल्या वाटसर यांनी तात्काळ रुग्णालयातील संबधितांना याबाबत कळविले. ब्रदर विष्णू खरात यांनी वार्डातील आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग आटोक्यात आणली..No Detention Policy: शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय! 'नो डिटेन्शन पॉलिसी' रद्द, आता पाचवी-आठवीतील अनुत्तीर्ण विद्यार्थी नापासच राहणार .दरम्यान रुग्णालयात दाखल असलेल्या व्यक्तीच्या बेडला आग लागून तो व्यक्ती जळत असल्याचे त्यांना दिसून आले.आग आटोक्यात आणण्यापर्यंत तो व्यक्ती जळून मृत्यू पावला होता. या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे, तहसिलदार भूषण पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करून पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. २३ डिसेंबर रोजी शासकीय प्रक्रिया पूर्ण करून अंत्यविधी करण्यात आला..या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांनी यावेळी ग्रामीण रूग्णालयात पाहणी केली. यावेळी तहसिलदार भूषण पाटील, पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे, नायब तहसिलदार रामप्रसाद डोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले हे उपस्थित होते. या घटनेबाबत लोणार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले, नितिन खरडे करीत आहेत. .पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून या व्यक्तीचे नाव हरिभाऊ बापुजी रोकडे असल्याची माहिती मिळाली आहे. आगीची ही घटना व्यक्तीने बिडी ओढल्या कारणाने घडली की शॉट सर्किटने घडली. याबाबत फायर ऑडीट झाल्यास सत्य बाहेर येऊ शकते. कर्तव्यावर असलेले ब्रदर विष्णू खरात यांनी सैनिक प्रशिक्षणाचा अनुभव पणाला लावत इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ६ आग विझवण्याचे सिलेंडर वापरून आग आटोक्यात आणत आगेवर नियंत्रण मिळविले. अन्यथा आग रुग्णालयात सगळीकडे पसरून आणखी मोठा अनर्थ घडला असता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.